ट्रॅफीक टाळण्यासाठी तुषार कपूरचा लोकल प्रवास

बॉलिवूड स्टार्स बऱ्याचदा आपल्या आलिशान गाड्यांमध्ये फिरताना आपण पाहतो. मात्र यापैकी काही सेलिब्रिटींनी मुंबईतील ट्रॅफिक टाळण्यासाठी लोकल ट्रेनने प्रवास केला आहे. आता बॉलिवूड अभिनेता तुषार कपूर याने 25 मेच्या रात्री लोकल ट्रेन प्रवास केला. याचा सेल्फी व्हिडीओ त्याने इन्स्टाग्राम टाकला असून सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tusshar Kapoor (@tusshark89)

बॉलिवूडचे जम्पिंग जॅक अभिनेते जितेंद्र यांचा मुलगा तुषार कपूर याने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तुषार लोकल ट्रेनने प्रवास करताना दिसत आहे. या व्हिडीओसोबत ” विरार चर्चगेट फर्स्ट क्लास लोकलमध्ये प्रवास करत असताना विंडो सीट मिळाली तर एक सेल्फी व्हिडीओ बनवायलाच हवा. मुंबई बाहेरील शूट लाइफमधून लवकर घरी परतायचे असल्यास ट्रॅफिक टाळायचे असल्यास ट्रेन हा उत्तम पर्यायी मार्ग आहे” असे कॅप्शन देखील दिले आहे.