किडणी स्टोनवर गुगल एआयने दिले अजब उत्तर, युजर्स संतापले

इंटरनेटनंतर आता तंत्रज्ञानाचे जग असलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) कडे वेगाने वाटचाल करत आहे. अनेक ॲप्स आणि सॉफ्टवेअरद्वारे, लोक एआय तंत्रज्ञानाचा वापर करून फोटोंपासून ते सामग्रीपर्यंत सामग्री तयार करत आहेत. तरीही कधी कधी त्यांच्यामार्फत मिळणारी माहिती धक्कादायक आणि विचित्र असते. गुगलच्या सर्च जनरेटिव्ह एक्सपिरियन्समध्येही असेच घडले आहे. एका युजरने किडनी स्टोन झाल्यास काय करावे याबाबत सर्च केले असता त्याला जे उत्तर दिले त्याने त्यालाच धक्का बसला आणि  त्याने सोशल मीडियावर त्याबाबत शेअर केले. त्यानंतर  गुगलच्या या तंत्रज्ञाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.

या तरुणाने गुगलवर पोटात खडा झाल्यावर काय करावे असा प्रश्न विचारला होता. त्यावर पाणी, आलं, लिंबूसोडा, फ्रूट, ज्यूस आदी पदार्थ किडणीतील स्टोन बाहेर काढण्यासाठी मदत करतात. पण त्यांनी पुढे सांगितले की, दिवसभरातून दोन लीटर शिवांभू पिणे असे गुगलकडून उत्तर मिळाले. गुगलच्य़ा या उत्तराने तो तरुणाला आश्चर्याचा धक्का बसला. त्याने गुगलची ही अजब माहिती सोशल मीडिया साईट एक्सवर शेअर केली आहे. त्यावर आता कॉमेण्ट्स येत आहेत. जे गुगलसाठी चिंता वाढवणारे आहे,

याप्रकरणी टेक जिनीअस माइक किंग यांनी हे चांगले तंत्रज्ञान नाही, तर एका युजरने लिहीले, आम्ही जवळपास अर्ध काम संगणक आणि डाटा सायन्सवर केले आहे, आता आम्ही याला एआय मार्केटींगकडे सोडले आहे, गूगलवर या अनोख्या सर्च रिझल्टनंतर अनेकांनी एआय तंत्रज्ञानाची मदत घेतली असता त्यांनाही हे उच्चर मिळाले आहे. याआधीही गुगलने आर्टिफिशिल इंटेलिजन्स जेमिनीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. एवढेच नाही तर एआय तंत्रज्ञानामुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. ट्रोल झाल्यानंतर आता एआयने आपल्या उत्तरात सुधारणा करत लिहीले, भरपूर पाणी प्यावे. दिवसभरातून दोन ते तीन लीटर पाणी प्यावे. विशेष करुन उन्हाळ्यात जास्त पाणी प्यायला हवे. व्हिटॅमीन सी असलेले पदार्थ खावेत. लठ्ठपणा, मधुमेह आणि कार्डियोशी संबंधित आजारांची काळजी घ्यावी. त्यानंतरही आराम पडला नसेल तर एंडोस्कोपी शस्त्रक्रिया करुन घ्यावी असे दिले आहे.