IPL 2024 : जे इतरांना जमलं नाही ते सूर्याने केल; शतक ठोकून रचला अनोखा विक्रम

आयपीएलच्या 55 व्या सामन्यात सूर्युकमार यादवच्या तुफानी शतकी खेळीमुळे मुंबईने हैदराबदचा 7 विकेटने पराभव केला. सूर्यकुमारने 51 चेंडूंमध्ये 12 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 102 धावांची शतकी खेळी केली. सूर्यकुमार यादवच्या शतकामुळे मुंबईचा विजय तर झालाच. मात्र त्याच्या या शतकी खेळीमुळे एक विक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे.

मुंबईच्या संघाने आयपीएलच्या सतराव्या हंगामात चाहत्यांची निराशा केली आहे. मुंबई इंडियन्स सध्या प्ले ऑफमधून बाहेर पडली आहे. या सर्व घडामोडींमध्ये सूर्यकुमार यादवने केलेले शतक चाहत्यांच्या दु:खावर फुंकर मारणार ठरले. सूर्यकुमार आयपीएलच्या इतिहासातील असा एकमेव हिंदुस्थानी फलंदाज आहे, ज्याने चौथ्या स्थानावर फलंदाजी करताना शतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला आहे. यापुर्वी कोणत्याही हिंदुस्थानी खेळाडूला असा विक्रम करता आलेला नाही. तसं पाहायला गेलं तर, चौथ्या स्थानावर फलंदाजी करताना बेन स्टोक्सने 2017 साली आणि डेविड मिलरने 2013 साली धावांचा पाठलाग करताना शतकी खेळी करत आपापल्या संघाला विजय मिळवून दिला होता.

मुंबईच्या अस्तानंतर सूर्योदय; सूर्याच्या शतकाने मुंबईचा विजय

सूर्यकुमार यादव या विक्रमासोबत टी-20 मध्ये 200 पेक्षा अधिकच्या सरासरीने 5 शतके ठोकणारा हिंदुस्थानी फलंदाज ठरला आहे. याबाबतीत शुभमन गिलने 200 पेक्षा अधिकच्या सरासरीने 4 शतके केली आहेत.