मतदानाच्या आदल्या दिवशीच प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू

लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा सुरू व्हायला आता अवघे काही तास शिल्लक आहे. या टप्प्यासाठी 20 मे रोजी मतदान पार पडत आहे. या मतदानासाठीची सर्व पूर्वतयारी प्रशासनाकडून पार पाडली जात आहे. निवडणूक अधिकाऱ्यांचं काम रविवारी सुरू झालं. दरम्यान, मुंबईतील वडाळा मतदारसंघात दुःखद घटना घडली आहे. येथील बुथ क्रमांक 189मधील प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू झाला आहे.

मुंबईतील 30 मुंबई दक्षिण-मध्य लोकसभा मतदार संघातील 180 वडाळा विधानसभा मतदारसंघ झोन 20 मधील बूथ क्रमांक 189 सेंट पॉल या मुलांच्या शाळेत प्रिसायडिंग ऑफिसरचा मृत्यू झाला आहे. त्यांचं नाव सुनील लक्ष्मण गवळी (56) असं या अधिकाऱ्यांचं नाव आहे. अचानक छातीत दुखू लागल्याने ते बेशुद्ध पडले होते. त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्यांचा त्या उपचारांदरम्यान मृत्यू झाला.