रत्नागिरी-सिंधुदुर्गात 3 वाजेपर्यंत 44.73 टक्के मतदान

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 1942 मतदान केंद्रावर आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ झाला.पहिल्या टप्प्यात दुपारी तीन वाजेपर्यंत या मतदारसंघात 44.73 टक्के मतदान झाले.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 1942 मतदान केंद्रावर 14 लाख 51 हजार 630 मतदार आहेत.आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला शांततेत सुरूवात झाली. सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत 8.17 टक्के मतदान झाले होते.त्यानंतर 11 वाजेपर्यंत मतदानाची आकडेवारी 21.29 टक्क्यावर पोहचली.दुपारी एक वाजेपर्यंत 33.91 टक्के मतदान झाले.दुपारी तीन वाजेपर्यंत 44.73 टक्के मतदान झाले.

त्यामध्ये चिपळूण विधानसभा मतदारसंघात 46.72 टक्के,रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात 41 टक्के,राजापूर विधानसभा मतदारसंघात 41.68 टक्के,कणकवली विधानसभा मतदारसंघात 46.04 टक्के,कुडाळ विधानसभा मतदारसंघात 48.44 क्के,सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात 45.01 टक्के मतदान झाले