दिग्विजय सिंह यांची मोठी घोषणा, राजकीय वर्तुळात उडाली खळबळ

digvijay-singh

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांनी मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले, ही माझी शेवटची निवडणूक असल्याचे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राजगडचे उमेदवार दिग्विजय सिंह म्हणाले की, काँग्रेस कार्यकर्त्यांना 100 मीटरच्या आत येऊ दिले जात नाही. भाजप नेते 100 मीटरच्या परिघात आहेत आणि त्यांनी प्रभू रामाचे बॅनर आणि पोस्टर्स लावले आहेत. काँग्रेस नेते पंकज यादव पोलीस ठाण्यात आहेत आणि गुन्हेगारी प्रवृत्तीची भाजपची लोकं मोकळेपणाने फिरत आहेत.

दिग्विजय सिंह यांनी ईव्हिएम मशीनबाबतही प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले चचौरा मतदान केंद्र संख्या 24वर मशीन आहे आणि त्यात 50 मतं देण्यात आली आहेत असे दाखवत आहेत. पण प्रत्यक्षात 11 मतं देण्यात आली होती. पुढे म्हणाले, ही माझी अखेरची निवडणूक आहे, आता मी 77 वर्षांचा झालो आहे, नव्या लोकांनाही संधी द्यायला हवी. याआधी दिग्विजय सिंह यांची पत्नी अमृता राय यांच्यासोबत हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले. दिग्विजय सिंह मध्य प्रदेशातील राजगड लोकसभा मतदार संघातून 33 वर्षांनी निवडणूक लढत आहेत.