शिरूर मतदारसंघात 11 जणांचे उमेदवारी अर्ज बाद; पुण्यात 42 जणांचे उमेदवारी अर्ज वैध

shirur-lok-sabha-constituency

पुणे लोकसभा मतदारसंघातील सर्वच्या सर्व 42 उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये वैध ठरले आहेत. शिरूरमध्ये ४६ पैकी ११ उमेदवारांचे अर्ज बाद झाले असून, यामध्ये बहुतांश अपक्ष मित्रांचा समावेश आहे.

उमेदवारी अर्ज यांची छाननी आज पुणे मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुहास दिवसे यांनी केली. यामध्ये एक अर्ज बाद झाला; परंतु त्या उमेदवाराचा दुसरा अर्ज वैध ठरल्याने त्याची उमेदवारी कायम राहिली.

शिरूर मतदारसंघातील उमेदवारी अर्जाची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी केली. यामध्ये 11 उमेदवारांचे अर्ज बाद झाले. त्यामुळे ३५ उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये वैध ठरले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या अर्जावर त्यांनी सोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांच्यावर दाखल असलेले गुन्हे नमूद केले नसल्याबद्दल हरकत नोंदविण्यात आली. मात्र, ती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी फेटाळली.

अर्ज बाद; द्या डिपॉझिट

शिरूरमधील एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज छाननीमध्ये बाद झाला. अर्ज बाद झाल्यानंतर या उमेदवाराने आपले डिपॉझिटची पंचवीस हजार रुपये रक्कम तत्काळ देण्याची मागणी केली. मला घरी जाण्यासाठी आता प्रवासालादेखील पैसे नाहीत. त्यामुळे डिपॉझिटची रक्कम मिळावी या मागणीसाठी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांचीदेखील भेट घेतली. मात्र, निवडणूक आयोगाच्या प्राप्त तरतुदीमध्ये अर्जाचे अपील आणि अनुषंगिक बाबी यांची पूर्तता होऊन प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर डिपॉझिटची रक्कम देण्याची तरतूद आहे. त्यामुळे या उमेदवाराला अर्ज बाद झाल्यानंतर डिपॉझिटची रक्कम तत्काळ मिळू शकली नाही.

कचाकचा बटने दाबा म्हणणाऱ्या अजित पवारांना क्लीन चिट

डॉ. कोल्हेंच्या अर्जावरील हरकत फेटाळली

शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल रामसिंग कोल्हे यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये गुन्हा दाखल असल्याची माहिती दिली नसल्याबद्दल छाननीमध्ये हरकत घेण्यात आली होती. परंतु, ती निवडणूक आयोगाने फेटाळत कोल्हे यांचा अर्ज मंजूर केला. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आफताब अन्वर शेख यांनी ही हरकत घेतली होती.

डॉ. कोल्हे म्हणाले, विरोधकांनी हा रडीचा डाव खेळला असून, यामागे कोणाचा हात हे दिसून येते. 2016 मध्ये ओबीसींच्या सभेला मी विरोध केला होता. या संदर्भातील गुन्ह्याविषयी मला कोणतीही कल्पना नव्हती, यावर त्यांचा आक्षेप होता.

मिंधे गटाच्या खासदाराचा डाव फेल; वाघेरे-पाटील यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या एकाचा अर्ज बाद