चंदिगडमध्ये भाजपचे फोडाफोडीचे राजकारण; अकाली दलाचे उमेदवार हरदीप सिंह बुटेरला यांनी पक्ष सोडला

लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी कुठल्याही थराला जाणाऱया भाजपने चंदीगडमध्येही पह्डापह्डीचे राजकारण सुरू केले आहे. शिरोमणी अकाली दलाला चंदीगडमध्ये धक्का बसला आहे. कारण बुटेरला यांनी निवडणुकीतून माघार घेतली असून पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामाही दिला आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या समर्थकांनीही पक्ष सोडल्याचे वृत्त आहे. बुटरेला हे भाजपामध्ये जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पक्षाच्या सर्व बडय़ा नेत्यांनी प्रचारासाठी यावे, अशी अट शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांच्यासमोर ठेवली होती. परंतु ते एकटेच चंदीगडमधून आपल्या समर्थकांच्या पाठिंब्याने निवडणूक मैदानात उतरले होते. बादल यांचा पक्ष पंजाबच्या 13 लोकसभा जागांसाठी प्रचार करत आहे; परंतु ते चंदीगडची जागा विसरले, असा आरोप हरदीप सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. बुटरेला यांच्या राजीनाम्यामुळे शिरोमणी अकाली दलाच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात चंदीगडमध्ये मतदान होणार आहे. या जागेवरून काँग्रेसने मनीष तिवारी यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे.