कचाकचा बटने दाबा म्हणणाऱ्या अजित पवारांना क्लीन चिट

पाहिजे तेवढा निधी देतो परंतु आमच्यासाठी निवडणुकीत कचाकचा बटणे दाबा या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यावर करण्यात आलेली आचारसंहिता भंगाची तक्रार बारामतीच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी क्लीन चिट देत निकाली काढली आहे.

आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या दौंड तालुक्यातील सभेत केलेल्या विधानावर आचारसंहिता भंगाची तक्रार केली होती. या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी संबंधित सभा त्याचबरोबर त्याचे व्हिडिओ रेकॉर्डींग आणि भरारी पथकाचा अहवाल मागवून त्या विधानाबद्दल सखोल चौकशी केली. त्यामध्ये अजित पवार यांनी बटन दाबा असे सांगताना पक्ष चिन्ह अथवा पक्षाचा उल्लेख केला नव्हता त्यामुळे ही तक्रार निकाली काढण्यात आल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवडणूक आयोगाला पाठवण्यात आला आहे.