माधुरी-करिष्मा पुन्हा एकत्र

 

बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि करिष्मा कपूर या दोघी तब्बल 27 वर्षांनंतर पुन्हा एकदा एकत्र दिसल्या. 1997 साली प्रदर्शित झालेल्या यश चोप्रा यांच्या ‘दिल तो पागल है’ या चित्रपटात या दोघी एकत्र काम करताना दिसल्या होत्या. त्यानंतर तब्बल 27 वर्षांनंतर या दोघी ‘डान्स दिवाने’ या टीव्हीवरील रिऑलिटी शोमध्ये एकत्र दिसल्या आहेत. माधुरी दीक्षित या शोमध्ये जज म्हणून काम पाहात आहे, तर करिष्मा कपूर एक स्पेशल गेस्ट म्हणून या कार्यक्रमात आली होती. माधुरी आणि करिष्मा  एकाच मंचावर एकत्रित आल्या.  माधुरी आणि करिष्माने ‘दिल तो पागल है’ या गाण्यावर स्टेजवर जबरदस्त डान्स केला. या दोघींचा डान्स परफॉर्मन्सचा व्हिडीओ चॅनेलने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. डान्स पाहून सुनील शेट्टीने टाळय़ा वाजवून दाद दिली.