‘त्या’ दोघींचं एकच शरीर, एकच लग्न, एकच नवरा!

अॅबी आणि ब्रिटनी हेन्सेल या सयामी जुळ्या बहिणी आता लग्नबंधनात अडकल्या आहेत. जोश बॉलिंग या व्यक्तीशी त्यांनी लग्नगाठ बांधली आहे. हेन्सेलने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे. त्यांच्या फोटोवर मित्रमंडळींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

फोटोमध्ये दोघी बहिणींनी पांढऱया रंगाचा वेडिंग गाऊन तर जोश याने करडय़ा रंगाचा सूट परिधान केला. फोटोमध्ये ते एकमेकांना मिठी मारत असल्याचे दिसतायत. एका फोटोत तो या सयामी जुळ्या बहिणींसोबत आईस्क्रीमचा आनंद लुटताना दिसतोय.

अॅबी आणि ब्रिटनी या शरीराने एकमेकांशी जोडल्या आहेत. अॅबी शरीराची उजवी बाजू तर ब्रिटनी शरीराची डावी बाजू नियंत्रित करते. त्या पेशाने शिक्षिका असून पाचवीच्या विद्यार्थ्यांना शिकवतात. 1996 मध्ये द ओपरा विन्फ्रे शोमध्ये झळकल्यानंतर त्या दोघी चर्चेत आल्या होत्या.

अॅबी आणि ब्रिटनी हेन्सेल युरोपमध्ये मिनेसोटा येथे राहतात. अॅबी आणि ब्रिटनी यांचा जन्म 1990 मध्ये झाला. दोघींचा चेहरा फक्त वेगळा आहे. बाकी सर्व शारिरीक अवयव सामायिक आहेत. जेव्हा त्यांचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या पालकांनी विभक्त शस्त्रक्रिया करण्याचा पर्याय नाकारला होता.

l