मिंधे गटात खदखद; सुरेश नवले यांचा राजीनामा

beed-lok-sabha-constituency

महायुतीतील जागावाटपावरून मिंधे गटात खदखद असून माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांनी आज राजीनामा देत मिंधे गटाला राम राम ठोकला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगरच्या दौऱयावर असतानाच नवले यांनी त्यांना धक्का दिला.

मुख्यमंत्री शिंदे हे भाजपच्या दबावाखाली आहेत. जे सोबत आलेत त्यांना ते उमेदवारी मिळवून देऊ शकलेले नाहीत.  या सर्वांचा राजकीय बळी देण्याचे काम शिंदेंनी केले आहे, असा जाहीर आरोप नवले यांनी केला होता. त्यानंतर आज नवले यांनी थेट मिंधेंना राम राम ठोकला.