निज्जर हत्येमागे लॉरेन्स बिष्णोई गँग?

खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमागे लॉरेंन्स बिष्णोई गँगचा हात असल्याचा दावा कॅनडा पोलिसांनी केला आहे. कॅनडा पोलिसांनी या हत्येप्रकरणात सहभागी असलेल्या तीन संशयित आरोपींना अटक केल्याचा दावासुद्धा केला आहे. एडमंटन शहरातून अटक करण्यात आलेले तिन्ही आरोपी हिंदुस्थानी असून करण ब्रार (22), करणप्रीत सिंग (28) आणि कमलप्रीत सिंग (22) अशी आरोपींची नावे असल्याचे पोलिसांनी म्हटले. परंतु पॅनडा पोलिसांनी हिंदुस्थानविरोधात कोणताही पुरावा सादर केला नाही. गेल्या वर्षी जूनमध्ये पॅनडा येथील ब्रिटिश कोलंबिया येथे दिवसाढवळ्या निज्जरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.