Photo – अदिती राव हैदरीचा लाल गुलाबी शरारा ड्रेसमधील रॉयल लूक

संजय लीला भन्साळी यांची ‘हीरामंडी’ ही वेबसीरीज प्रचंड चर्चेत आहे. या सिरीजमधील काही सीन प्रेक्षकांच्या मनात कोरले गेले आहेत. त्यातलाच अदिती राव हैदरी हिने साकारलेले ‘बिब्बोजान’ ची भूमिका आणि तिची ‘गज गामिनी चाल’ तुफान व्हायरल झाली आणि अदिती राव हैदरी पुन्हा चर्चेत आली. अदितीने इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यात ती प्रचंड सुंदर दिसत आहे. अदितीने लाल गुलाबी रंगाचा मॉर्डन टच असलेला शरारा ड्रेस घातला आहे. गुलाबी रंगाच्या शराऱ्यावर लाल रंगाचा अॅम्ब्रोडरी केलेला कुर्ता घातला आहे. कुर्त्याच्या ब्लाऊजच्या हातावर अॅम्ब्रोडरी केलेली आहे. या शरारा सेटवर तिने ऑक्सिडाीइज्ड झुमके घातले आहेत. अदितीने केस बांधले असून कपाळावर लहानशी टीकली लावली आहे. त्यात ती प्रचंड सुंदर दिसत आहे.