काय सांगता! 3 लाख रुपये किलो आंबा

 

जगातील सर्वात महाग आंबा कोणता असे विचारले तर आपसूकपणे सिंधरी किंवा अल्फान्सो आंबा म्हटले जाते. परंतु सर्वात महाग आंबा जपानमधील मियाजाकी आहे. या आंब्याची चव, लुक आणि सुगंध सर्वांनाच मोहून टाकणारा आहे. हा आंबा जपानच्या क्यूशू प्रांतात आढळतो. या आंब्याचा रंग गडद लाल असतो. याला जपानी भाषेत ‘ताइयो-नो-टोमैगो’  म्हणजेच सूर्याचे अंडे असेही म्हटले जाते. मियाजाकी आंब्याची बाजारात किंमत प्रति किलो 3 लाख रुपये आहे. हा आंबा जगातील सर्वात महागडा आंबा म्हणून ओळखला जात आहे. एका आंब्याचे वजन 350 ग्रॅम असते. हा आंबा केवळ जपानमध्ये आढळत नाही तर तो हिंदुस्थानातसुद्धा आढळतो. पश्चिम बंगालमधील बीरभूमी जिह्यात हा आंबा दिसतो. या आंब्याला यावर्षी सिलीगुडी आंबा महोत्सवाच्या प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. देशात महागडा आंबा सिंधरी आहे. हा आंबा 3 हजार रुपये प्रति किलो विकला जातो.