आयआयटी पास होऊनही काम नाही! दिल्लीतील 22 टक्के विद्यार्थी प्लेसमेंटविना

आयआयटी पॅम्पसमध्ये भरणाऱया प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देश-विदेशातील नामांकित पंपन्यांमध्ये वार्षिक लाखो रुपयांच्या पॅकेजची ऑफर मिळते. मात्र दिल्ली आयआयटीमध्ये वर्ष 2019 पासून झालेल्या प्लेसमेंटवरच आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 2019 ते 2023 दरम्यान झालेल्या पॅम्पस प्लेसमेंटमध्ये 22 टक्के विद्यार्थ्यांना संधीच मिळाली नसल्याची माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कायद्यांतर्गत मिळालेल्या माहितीआधारे आयआयटी दिल्लीतील प्लेसमेंटमधील धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. मागील 5 वर्षांत आयआयटीतील 22 टक्के विद्यार्थ्यांना पॅम्पस प्लेसमेंटद्वारे जॉब्सची संधी मिळालेली नाही. आयआयटी कानपूरचे माजी विद्यार्थी आणि जागतिक आयआयटी माजी विद्यार्थी सपोर्ट ग्रुपचे संस्थापक धीरज सिंहने माहिती अधिकार कायद्यांतर्गत आयआयटी दिल्लीतील प्लेसमेंटसंदर्भात माहिती मागविली होती.

 

माहिती अधिकार कायद्यांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार

– वर्ष 2021-22 मध्ये आयआयटी दिल्लीचे सरासरी प्लेसमेंट पॅकेज 23.8 लाख रुपये होते. वर्ष 2022-23 मध्ये यात घट होऊन ते 21.9 लाख एवढे झाले.

– वर्ष 2021-22 मध्ये 1105 विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट झाले. त्या वेळी 366 विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली नाही.

– त्याचप्रमाणे वर्ष 2022-23 मध्ये 1513 विद्यार्थ्यांनी प्लेसमेंटसाठी नोंदणी केली होती. यातील 1270 विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट झाले, तर 243 विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली नाही.