सॅम पित्रोदा यांचा इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी दक्षिण व ईशान्य हिंदुस्थानातील व्यक्तींबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या विधानावरून वाद निर्माण झाल्यानंतर पित्रोदा यांनी त्यांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांचा राजीनामा मान्य केला आहे.

काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. ”सॅम पित्रोदा यांनी त्यांच्या मर्जीने इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा काँग्रेस अध्यक्षांनी स्वीकार केला आहे”, असे जयराम रमेश यांनी ट्विट केले आहे.

सॅम पित्रोदा यांनी हिंदुस्थानच्या दक्षिणेत राहणारी लोकं आफ्रिकन लोकांसारखी तर ईशान्य हिंदुस्थानातील लोकं चीनी लोकांप्रमाणे दिसतात असं वक्तव्य केलं होतं.