Lok Sabha Election 2024 – महाराष्ट्रात 59.63 टक्के मतदान

देशात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱया टप्प्याचे मतदान आज पार पडले. यामध्ये महाराष्ट्रातील आठ मतदारसंघांचा समावेश असून राज्यात सरासरी 59.63 टक्के मतदान झाले. देशभरात 13 राज्यांतील 88 जागांसाठी सरासरी 66.12 टक्के मतदान झाले. यामध्ये त्रिपुरात सर्वाधिक 76.23 टक्के, तर महाराष्ट्र, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये सर्वात कमी मतदान झाले आहे.

महाराष्ट्रात निवडणुकीच्या दुसऱया टप्प्यात मराठवाडय़ातील 3 आणि विदर्भातील 5 मतदारसंघांत मतदान झाले. यामध्ये नांदेड, हिंगोली, परभणी, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा आणि यवतमाळ-वाशीम या आठ मतदारसंघांचा समावेश आहे

राज्यातील मतदानाची टक्केवारी

मतदारसंघ 2019 2024
नांदेड 65.69 59.57
हिंगोली 66.84 60.79
परभणी 63.12 60.09
बुलढाणा 63.06 58.45
अकोला 60.06 58.09
अमरावती 60.76 60.74
वर्धा 61.53 62.65
यवतमाळ-वाशीम 61.31 57.00

नांदेड मतदारसंघातील ज्येष्ठ मतदार लिंगराम शुरकांबळे (92) यांनी रगरगत्या उन्हात क्हिलचेअरकरून पोलिंग बुथवर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला.