मोदीजी एक काम करा, सीबीआय ईडीला अदानी अंबानींकडे पाठवा; राहुल गांधी यांचा मास्टरस्ट्रोक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी एका सभेत बोलताना राहुल गांधी यांच्यावर टीका केली. काँग्रेसने अदानी व अंबानी यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेतल्याचा आरोप मोदींनी केला आहे. हा आरोप करताना मोदी म्हणाले की निवडणूक येताचा राजकुमारांनी अदानी व अंबानींचं नाव घेणं बंद केलं आहे. त्यावरून आता राहुल गांधी यांनी जोरदार पलटवार केला आहे. राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ शेअर करत मोदींजींच्या त्या आरोपाची पिसे काढली.

”नमस्कार मोदीजी, घाबरलात का? साधारणत: तुम्ही दाराआड अदानी आणि अंबानी यांच्या बद्दल बोलता. पहिल्यांदा तुम्ही चार लोकांमध्ये अदानी अंबानींचा उल्लेख केला आहे आणि अदानी अंबानी टेम्पोतून पैसे देतात हे देखील तुम्हाला माहित आहे. हा तुमचा स्वत:चा अनुभव आहे का. एक काम करा सीबीआय ईडीला त्यांच्याकडे पाठवा. संपूर्ण माहिती घ्या. तपास करायला लावा. लवकर करा. घाबरू नका, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे”, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला

मला देशाला सांगायचे आहे की नरेंद्र मोदीजींनी जेवढा पैसा यांना दिलाय तेवढाच पैसा आम्ही देशातील गरिबांना देणार आहोत. महालक्ष्मी योजना, पहिली नोकरी योजना आम्ही आणल्या आहेत. या योजनांतून करोडो लोकांना लखपती बनवू. यांनी 22 लोकांना कोट्यधीश बनवले आम्ही कोट्यवधी लखपती बनवू, असे आश्वासन राहुल गांधी यांनी या व्हिडीओतून दिले आहे.