केटीएम कपला वेगवान सुरुवात

240 बाईकस्वारांचा सहभाग असलेल्या केटीएम कप शर्यतीच्या दुसऱया मोसमाला आज ठाण्यात वेगवान सुरुवात झाली. तीन दिवस चालणाऱया या स्पर्धेची पश्चिम विभागीय पात्रता फेरी असून यातील अव्वल 20 खेळाडू 24 ते 26 मेपर्यंत कोइम्बतूर येथे होणाऱया अंतिम शर्यतीसाठी पात्र ठरतील. या स्पर्धेची पूर्व विभागीय पात्रता फेरी 10 ते 12 मेदरम्यान कोलकाता येथे रंगणार आहे. या आधी कोइम्बतूर येथे दक्षिण विभागीय आणि दिल्ली येथे उत्तर विभागीय पात्रता फेरी पार पडली होती. गेल्या वर्षी झालेल्या केटीएम कपच्या पहिल्या मोसमाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यामुळे स्पर्धेचा दुसरा मोसम आणखी भव्य आणि दिव्य करण्यात आला आहे.