हिंदुस्थान सोडण्याचा व्हॉट्सअॅपचा इशारा!

हिंदुस्थानात व्हॉट्सअॅपचे कोटय़वधी युजर्स आहेत. प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप वापरले जाते, परंतु आता व्हॉट्सअॅप कंपनी आणि केंद्र सरकार यांच्यात नियमांवरून वाद उफाळून आला आहे. हिंदुस्थानातील सरकारने दबाव आणल्यास आम्ही हिंदुस्थानातील सेवा तत्काळ बंद करू, असा इशारा व्हॉट्सअॅप कंपनीने दिला आहे. कंपनीने दिल्ली उच्च न्यायालयात माहिती देऊन हा निर्वाणीचा इशारा दिला आहे. सरकार कंपनीला मेसेजचे एन्क्रिप्शन तोडण्यास भाग पाडण्यासाठी दबाव आणत आहे, परंतु कंपनी या दबावाला बळी पडणार नाही. सरकारने जास्त दबाव आणल्यास आम्ही आमची हिंदुस्थानातील सेवा बंद करू, असे व्हॉट्सअॅप पंपनीने म्हटले आहे. मेटा, व्हॉट्सअॅप आणि फेसबुक या मोठय़ा प्लॅटफॉर्मने नव्या सुधारित आयटी नियमांविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

 

एंडटूएंड एन्क्रिप्शन म्हणजे काय?

एंडटूएंड एन्क्रिप्शन ही एक संवाद प्रणाली आहे, ज्यामध्ये संदेश पाठवणारा आणि संदेश मिळवणारा वगळता कोणालाही हा मेसेज दिसत नाही. पंपनीदेखील वापरकर्त्यांचे संदेश पाहू शकत नाही.