पालघरच्या मच्छीमाराचा पाकिस्तानात मृत्यू

पाकिस्तानी जेलमध्ये बंद असलेल्या पालघर येथील विनोद लक्ष्मण कोल (45) यांचा मृत्यू झाला आहे. कोल यांचा 17 मार्चला मृत्यू झाला आहे. विनोद पोल हे डहाणू येथील रहिवासी आहेत. त्यांचा मृतदेह पाकिस्तानातून डहाणूला 29 एप्रिलला पोहोचण्याची शक्यता आहे. विनोद हे गुजरातमधील नोंदणीकृत मासेमारी करणाऱया नावेवर काम करत होते. चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेल्यानंतर त्यांना दोन महिन्यांपूर्वी पाकिस्तानी नौसेनेने अटक केली होती.