
वर्ल्ड इंटेलेक्च्युअल फाऊंडेशनने ‘रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स, 2026’ची यादी जाहीर केली असून या यादीत हिंदुस्थानला ‘टॉप 10’मध्ये स्थान मिळवण्यात अपयश आले आहे. हिंदुस्थान या यादीत 16 व्या स्थानी आहे. या यादीत ‘टॉप-10’च्या यादीत पहिले स्थान हे सिंगापूरने पटकावले आहे. दुसऱया नंबरवर स्वित्झर्लंड, तिसऱया स्थानी डेन्मार्प, त्यानंतर सायप्रस, स्वीडन, चेकिया, बेल्जियम, ऑस्ट्रिया, आयर्लंड आणि जॉर्जियाला स्थान देण्यात आले आहे. या रँकिंगमध्ये एपूण 154 देश आहेत. इंटेलेक्च्युअल फाऊंडेशनने ‘रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स, 2026’ मध्ये कोणता देश पॉवरफुल आहे, हे विचारण्यात आले नाही. ही एक जागतिक सिस्टम असून यात एपूण 154 देशांचे विश्लेषण करण्यात आले आहे. यामध्ये कोणत्या देशात शासन व्यवस्थेत पारदर्शकता आणि नैतिकता आहे, देशातील नागरिकांची सामाजिक सुरक्षा आणि जीवनस्तर कसा आहे, देशात पर्यावरणासाठी कोणती ठोस पावले उचलली जात आहेत, आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर देश कसा व्यवहार करतो, हे पाहिले जाते गेले आहे.


























































