2017 साली इस्रोने ‘पीएसएलव्ही- 37’ रॉकेटच्या सहाय्याने एकाचवेळी 104 उपग्रह अंतराळात सोडून इतिहास रचला. तेव्हापासून ‘पीएसएलव्ही- 37’ या रॉकेटचा वरचा हिस्सा ‘पीएस4’ अंतराळात फिरत होता. त्यावर इस्रोने सातत्याने लक्ष ठेवले होते, ट्रेकिंग केले होते. ‘पीएस4’ हिस्सा 470 बाय 494 किलोमीटर आकाराच्या अंडाकृती कक्षेत फिरत होता. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे तो खाली येत होता. अशा तऱहेने तब्बल सात वर्षांनी म्हणजे 6 ऑक्टोबर 2024 रोजी ‘पीएस4’ पृथ्वीच्या कक्षेत परतले. वायुमंडळाला पार करत ते उत्तर अटलांटिक महासागरात पडले. ‘पीएस4’ सुरक्षितपणे खाली यावे आणि त्यामुळे लोकांचे नुकसान होऊ नये, म्हणून इस्रोने विशेष अभियान राबवले. अनेक देश अवकाशात उपकरणे सोडत आहेत. त्यामुळे अंतराळात कचरा वाढत आहे. 2030 पर्यंत इस्रोने कचरामुक्त अंतराळ मिशनचे उद्दीष्ट ठेवले आहे.