मुंबई – गोवा महामार्गालगतच्या वृक्ष लागवडीचे 1 कोटी 51 लाखांचे अनुदान वर्ग

vinayak-bhaurao-raut

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणात तोडलेल्या झाडांच्या बदल्यात शासनाने सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून 1 किमी परिसरात वृक्ष लागवड करण्याची योजना अंमलात आणली. त्याअंतर्गत सिंधुदुर्गातील 170 शेतकऱ्यांनी खाजगी क्षेत्रात 52631 वृक्ष लागवडीची कामे केली असून त्यासाठीचे 1 कोटी 51 लाख 26 हजार 885 रुपयांचे प्रथम वर्ष अनुदान सामाजिक वनीकरण विभागाकडे वर्ग करण्यात आले आहेत. दरम्यान लवकरच या अनुदानाचे लाभार्थी शेतकऱ्यांना वाटप करण्यात येईल, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.

2019 मध्ये या झाडांची लागवड करण्यात आली होती. मात्र, त्याचे अनुदान अद्याप मिळाले नव्हते. यासाठी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांच्याकडून राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वारंवार पाठपुरावा सूरु होता. त्यांच्या पाठपुरवठ्याला यश आले असून शेतकऱ्यांनी लावलेल्या वृक्ष लागवडीचे अनुदान सामाजिक वनीकरण विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. कणकवली ते झारापपर्यंत 170 शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनेतंर्गत 1 किमी पर्यंतच्या आपल्या खाजगी क्षेत्रात 52,631 वृक्षांची लागवड केली होती. त्यासाठी प्रथम वर्षासाठी 1 कोटी 51 लाख 26 हजार 885 रुपये अनुदान देणे अनिवार्य होते. मात्र, राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत हे अनुदान सामाजिक वनीकरण विभागात वर्ग झाले नव्हते. त्यामुळे लाभार्थी शेतकरी लोकप्रतिनिधींकडे हे अनुदान लवकरात लवकर मिळावे यासाठी मागणी करत होते. यामुळे खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत व आमदार वैभव नाईक यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे पाठपुरावा करून लाभार्थी शेतकऱ्यांचे अनुदान मंजूर करून घेतले आहे. हे अनुदान सामाजिक वनीकरण विभागाकडे वर्ग झाले असून लवकरच त्याचे लाभार्थी शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या