यमुना नदीत भाविकांची बोट उलटली; 10 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मथुरेतील वृंदावन येथे शुक्रवारी यमुना नदीत भाविकांनी भरलेली एक नाव उलटल्याने 10 भाविकांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सदर नाव पुलाला धडकल्याने हा भीषण अपघात झाल्याचे समजते. या बोटीत 20 ते 30 प्रवासी प्रवास करत होते. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाने तत्काळ धाव घेत काही प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले, मात्र 10 जणांना वाचवण्यात अपयश आले. अद्याप काही जण बेपत्ता असून शोधमोहिम राबवण्यात येत आहे.

बोट उलटल्याचे कळताच स्थानिक बचाव पथक व पोलिसांनी घटनास्थळी बचाव कार्य सुरू केले. आतापर्यंत 10 भाविकांचे मृतदेह सापडले असून 22 जणांना रुग्णालयात नेण्यात आले आहे. हे सर्व भाविक मुळचे पंजाबचे आहेत.