10 आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश; जे.पी. नड्डा, राम माधव यांच्या उपस्थितीत कमळ घेतले हाती

1670

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळाले. यानंतर आता अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंटचे (एसडीएफ) 10 आमदार भाजपच्या गळाला लागले असून मंगळवारी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि सरचिटणीस राम माधव यांच्या उपस्थितीत आमदारांनी कमळ हाती घेतले.

सिक्किममध्ये सध्या सिक्किम क्रांतीकारी मोर्चाचे (एसकेएम) सरकार आहे आणि प्रेम सिंह तमांग हे मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार सांभाळत आहेत. तर गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये पवन कुमार चामलिंग यांचा पक्ष एसडीएफचे 15 आमदार जिंकले होते. यापैकी 10 आमदारांनी मंगळनापी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

सिक्कीममध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने खातेही उघडले नव्हते. त्यांचा एकही आमदार निवडू आला नव्हता. परंतु आता एका क्षणात भाजपने शून्य आमदारावरून 10 आमदारांवर झेप घेतली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या