मुंबईकरांसाठी खूशखबर, 10 टक्के पाणीकपात रद्द

33

सामना प्रतिनिधी । मुंबई

जुलै महिन्याच्या सुरुवातील मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने मुंबईकरांसाठी चांगली बातमी दिली आहे. आतापर्यंत झालेल्या चांगल्या पावसामुळे नोव्हेंबर 2018 पासून सुरू असलेली 10 टक्के पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत पालिका प्रशासनाकडून पाणी कपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तलाव क्षेत्रांत 51% टक्के पाणीसाठा जमा झाला असून सप्टेंबरमध्ये तलाव क्षेत्रात जोरदार पाऊस होण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या