
मागील मोठय़ा कालावधीपासून हिंसाचाराच्या आगीने जळत असलेले मणिपूर अद्याप अशांतच आहे. येथील चंदेल जिह्यात झालेल्या चकमकीत आसाम रायफल्सच्या जवानांनी दहा अतिरेक्यांना ठार केल्यानंतर आज सकाळी ऑपरेशन राबवण्यात आले. डोंगराळ भागात हिंदुस्थान-म्यानमार आंतरराष्ट्रीय सीमेजवळ चकमक झाल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. सुरक्षा दलाच्या दिशेने गोळीबार करणाऱयांची अद्याप ओळख पटलेली नाही. चकमकीनंतर मोठय़ा प्रमाणात शस्त्रs आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. सुरक्षा दलांनी राज्याच्या वेगवेगळय़ा जिह्यांतून विविध प्रतिबंधित संघटनांशी संबंधित सात अतिरेक्यांच्या मुसक्या आवळल्या. थौबल, ककचिंग, बिष्णुपूर आणि चुराचंदपूर जिह्यातून त्यांना अटक करण्यात आली.