100 कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेच्या याचिकेवर उच्च न्यायालयात 11 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. याचिकेवर दुसऱ्या खंडपीठाने अंतरिम आदेश देण्यास नकार दिला होता. त्यानंतर मंगळवारी न्यायमूर्ती महेश सोनक आणि न्यायमूर्ती कमल खाता यांचे खंडपीठ सुनावणी घेण्यास तयार झाले.
वाझे मार्च 2021 पासून तुरुंगात आहे. त्याने सुटकेसाठी अॅड. रौनक नाईक यांच्यामार्फत रिट याचिका केली आहे. यापूर्वी या याचिकेवर न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाने अंतरिम आदेश देण्यास नकार देत अन्य खंडपीठाकडे जाण्यास सांगितले होते. त्यानुसार मंगळवारी न्यायमूर्ती महेश सोनक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.