105 वर्षांच्या आजीने दिली चौथीची परिक्षा

केरळमधील 105 वर्षांच्या आजीने तिचे अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. या आजीबाईंनी रविवारी चौथीची परिक्षा दिली असून त्यांनी या परिक्षेत घवघवीत यश देखील मिळवले आहे. भागीरथी अम्मा अरे त्या आजीचे नाव असून त्या केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील पाराकुलम गावातील रहिवासी आहेत. भागिरथी अम्मा या देशातील सर्वात मोठ्या वयाच्या विद्यार्थी ठरल्या आहेत.

भागीरथी अम्मा यांनी 6 नातवंड व 16 पतवंडे आहेत. वयाच्या नवव्या वर्षी भागिरथी अम्मांनी त्यांच्या लहान भावंडांचा सांभाळ करता यावा यासाठी तिसरीत असताना शाळा सोडली. मात्र पुढे शिकण्याची त्यांची फार इच्छा होती. त्यांची ही इच्छा केरळमधील लिटररी मिशनने पूर्ण केली आहे. लिटररी मिशनने आजींना चौथ्या इयत्तेची पुस्तकं आणून दिली. त्या पुस्तकांच्या आधारे अभ्यास करत आजींनी रविवारी चौथीची परिक्षा दिली. त्यांनी गणित, पर्यावर व मलयाळम भाषेचे पेपर लिहले. रविवारी त्यांना या तिनही विषयांच्या प्रश्न व उत्तर पत्रिका दिल्या होत्या.वयामुळे त्यांचे लिखान संथ झाले होते. त्यामुळे त्यांचे तिनही पेपर बुधवारी संध्याकाळी पूर्ण झाले. भागीरथी अम्मा यांना तीनही पेपरचे मिळून 275 पैकी 205 गुण मिळाले आहे. अम्मा या हिशोबाच्या एकदम पक्क्या असल्याने त्यांना गणितात पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या