मुलांनो तयारीला लागा… दहावी, बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर

3437
Exams
प्रातिनिधिक फोटो

दहावी आणि बारावीची परीक्षा म्हणजे आयष्यातील टर्निंग पॉईंट असे मानले जाते. याच दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक सोमवारी जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, दहावीची लेखी परीक्षा मंगळवार दिनांक 3 मार्च 2020 ते सोमवार, दिनांक 23 मार्च 2020 या कालावधीत घेण्यात येणार आहे.

ssc

इयत्ता 12 वीची लेखी परीक्षा मंगळवार दिनांक 18 फेब्रुवारी 2020 ते बुधवार दिनांक 18 मार्च 2020 या कालावधीत घेण्यात येणार आहे. या सोबतच प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि इतर विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळांना तसेच कनिष्ठ महाविद्यालयांना कळवण्यात येईल असे शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे.

शिक्षण मंडळाचे हे अंतिम वेळापत्रक पुणे, नागपूर, संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा 9 विभागीय मंडळांमार्फत घेण्यात येणाऱ्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षांसाठी आहे. हे वेळापत्रक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक 10 ऑक्टोबर 2019 पासून उपलब्ध असल्याचे मंडळाने जाहीर केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या