
दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या निकालाची उत्सुकता ताणली आहे. आता मात्र या निकालाची प्रतीक्षा संपणार आहे. लवकरच 10 वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लागणार आहे. मुख्य म्हणजे परीक्षा कोणतीही असो, निकाल कधी लागणार याची आपण कायमच प्रतीक्षा करत असतो. महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्डाकडून SSC अर्थात इयत्ता 10 वीचा निकाल हा 13 मे रोजी जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजता आॅनलाईन हा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागातील मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आल्या होत्या.
हा रिझल्ट जाहीर झाल्यानंतर 10 वीची परीक्षा दिलेले सर्व विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर mahresult.nic.in, sscresult.mkcl.org आणि sscresult.mahahsscboard.in या लिंकवर तपासू शकता. https://mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईट्सवर शाळांना एकत्रितपणे निकाल पाहता येणार आहे.
यंदा सुमारे 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी, विद्यार्थ्यांची संख्या, विभागवार निकाल इत्यादींचा समावेश त्यामध्ये असेल. यावर्षी दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी रोजी सुरू झाली आणि 17 मार्च रोजी संपली होती.
दहावीचा निकाल तपासण्यासाठी काय कराल?
महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाइट mahahsscboard.in ला भेट द्या.
होम पेजवर उपलब्ध असलेल्या महाराष्ट्र एसएससी निकाल 2025 लिंकवर क्लिक करा.
एक नवीन पेज उघडेल, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्यांचे डिटेल्स द्यावे लागतील.
सबमिट वर क्लिक करा आणि निकाल पहा.