11 एप्रिलपासून लातुरातील दुकाने दुपारी दोननंतर बंद

2354
प्रातिनिधिक फोटो

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी जिल्ह्यातील किराणा दुकाने, डेअरी, बेकरी दिनांक 11 एप्रिलपासून दुपारी दोननंतर बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.

महाराष्ट्रातील कोरोना चा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी लातूर जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील किराणा दुकान, डेअरी, बेकरी, या स्थापना केवळ दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी दिलेली आहे. दुपारी दोननंतर या सर्व आस्थापना बंद राहतील. त्याचप्रमाणे यापूर्वी ज्या आस्थापनांना 24 तास खुले ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली होती ते मॉल ही दुपारी दोन नंतर केवळ घरपोच डिलिव्हरी देण्याचे काम करतील, असे आदेश बजावण्यात आले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी लातूर जिल्ह्यात 11 एप्रिलपासून होणार असल्याचे जाहीर केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या