बेकायदेशीर प्रवास करणार्‍या रोहिग्यांची निर्वासित छावणीत रवानगी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मिझोरममध्ये पोलिसांनी 12 रोहिंग्या निर्वासितांना छावणीमध्ये पाठवले आहे. मानवी तस्करीमधून त्यांची सुटका केली असून ते बेकायदेशीररित्या हिंदुस्थानमध्ये प्रवास करत होते.

गेल्या रविवारी पोलिसांनी आठ महिला रोहिंग्या आणि चार अल्पवयीन मुलांना ऐज्वालमध्ये एका स्थानिक महिलेकडे पकडले. हे रोहिंग्या निर्वासित हिंदुस्थानमध्ये कुठल्याही कागदपत्राविना राहत होते. म्यानमारमधील एका नातेवाईकांनी सांगितल्याने आपण त्यांना आश्रय दिल्याचे त्या स्थानिक महिलेने सांगितले.

या अल्पवयीन मुलांना अनाथालयामध्ये पाठवले असून महिलांना छावणीत पाठवले आहे. सर्व रोहिंगे निर्वासित बांग्लादेशातील छावण्यातून आले असतील असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच यांची तस्करी करण्यासाठी त्यांना मिझोरमध्ये आणले असेल असा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.

ऑगस्ट 2017 नंतर म्यानमारमधील रखाईन प्रांतातून सात लाख रोहिंगे मुसलमानांनी पळ काढला आणि जवळील देशांमध्ये आश्रय घेतला. या निर्वासितांमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. यातील अनेक लोक हे मानवी तस्करीचे शिकार झले असून त्यांना चांगली नोकरी आणि पैशांचे आमिष दाखवून त्यांना जाळयात ओढले गेले.