अविश्वसनीय ! डोळ्यांच्या इशाऱ्याने १२ वर्षाच्या मुलाने लिहिले पुस्तक

45

सामना ऑनलाईन । लंडन

इंग्लंडच्या विल्टशायरमधील एका १२ वर्षाच्या मुलाने ‘आय कॅन राईट’ नावाचे पुस्तक केवळ वर्षभरात लिहिले आहे. विशेष म्हणजे हा मुलगा शरीराची कोणतीही हालचाल करू शकत नाही किंवा तो बोलू शकत नाही. फक्त डोळ्यांनी इशारे करत त्याने वर्षभरात पुस्तक लिहिले आहे. सकारात्मकता आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्याने हे अविश्वयनीय काम केले आहे.

जोनाथल ब्रायल हा १२ वर्षांचा मुलगा जन्मापासून सेरेब्रल पाल्सी या गंभीर आजाराने त्रस्त आहे. तो नेहमी व्हीलचेअरवरच असतो. तो स्वतःच्या शरीराची कोणतीही हालचाल करू शकत नाही. त्याचे आई-वडील त्याच्याशी हातवारे करून त्याचे डोळ्याचे इशारे समजून त्याच्याशी संवाद साधतात. त्याला शिकवणे कठीण असल्याचे शिक्षकांनी सांगितले होते. मात्र, जोनाथनची शिकण्याची इच्छाशक्ती प्रबळ होती. त्यामुळे त्याची आई त्याला रोज शाळेत घेऊन जायची. तसेच त्याच्याशी संवाद साधत त्याला शिकवण्याचा प्रयत्न करायची. जोनाथन नऊ वर्षांचा झाला तेव्हा फक्त काही शब्दच त्याला बोलता येत होते. त्यानंतर ई ट्रेन फ्रेमच्या मदतीने तो इतरांशी संवाद साधू लागला. ई ट्रेन फ्रेम म्हणजे सांकेतिक शब्दांचा बोर्ड असतो. त्यातील चित्रे ,चिन्हे दाखवून संवाद साधता येतो. तसेच या बोर्डच्या मदतीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही देता येतात.

आम्ही जोनाथनच्या डोळ्यात बघायचो. तो डोळ्यांच्या इशाऱ्याने सांगायचा ते लिहून त्याला सांकेतिक भाषेत सांगण्यात येत होते. त्याने केलेले डोळ्यांनी केलेले इशारे समजून घेऊन, त्याला विचारून ते लिहून घेण्यात आले. अशा प्रकारे हे पुस्तक पूर्ण करण्यासाठी एक वर्ष लागले, असे जोनाथनच्या आईने सांगितले. आपला देवावर अढळ विश्वास आहे. हा विश्वासच आपल्या जीवनाचा महत्वाचा भाग असल्याचे जोनाथनने सांगितले. शारीरिकदृष्टीने शक्य नसतानाही या विश्वासाच्या जोरावरच पुस्तक लिहिल्याचे तो म्हणाला. या पुस्तकामुळे इतरांना प्रेरणा देण्याचा हेतू आहे. तसेच या पुस्तकाच्या विक्रीतून मिळणारी रक्कम ई ट्रेन फ्रेम च्या वापर करायला प्रोत्साहन देण्यासाठी खर्च करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या