120 Bahadur Teaser – ये वर्दी सिर्फ हिम्मत नहीं, बलिदान भी मांगती है! ‘120 बहादूर’चा अंगावार काटा येणारा टीझर रिलीज

हिंदुस्थान-चीनमधील 1962 युद्धावर आधारित बहुचर्चित ‘120 बहादूर’ या चित्रपटाचा टीझर मंगळवारी रिलीज झाला. देशभक्तीची रक्ताने लिहिलेली ही गाथा असून चित्रपटाचा टीझर अक्षरश: अंगावर काटा आणतो.

‘120 बहादूर’ या चित्रपटामध्ये अभिनेता फरहान अख्तर हा परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आलेल्या मेजर शैतान सिंह भाटी यांच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. फरहान सोबत एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे अभिनेते अजिंक्य रमेश देव, अभिनेत्री राशी खन्ना, स्पर्श वालिया हे कलाकारही प्रमुख भूमिकेत दिसतील. रजनीश घई यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून 21 नोव्हेंबर 2025 रोजी हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होईल.

‘120 बहादूर’ या चित्रपटाचे चित्रिकरण 14 हजार फूट उंचावर लडाख येथे करण्यात आले आहे. चित्रिकरणावेळीही येथील तापमान उणे 5 ते उणे 10 अंश एवढे होते. यासह राजस्थान आणि मुंबईतील काही दृश्य चित्रित करण्यात आलेली आहे. याचा टीझर आता रिलीज करण्यात आला आहे.