गेल्या 10 महिन्यात 128 नक्षलवाद्यांचा खात्मा, खुद्द नक्षलवाद्यांची कबुली

359

गेल्या 10 महिन्यात सुरक्षादलाने 128 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. सर्वाधिक नक्षलवादी हे छत्तीसगडमध्ये मारले गेले आहेत. खुद्द नक्षलवाद्यांनी ही आकडेवारी जाहीर केली आहे. तसेच छत्तीसगडसह आंध्र – ओडिशा सीमा, महाराष्ट्रात संघटनेला मोठे नुकसान झाल्याची कबुली नक्षलवाद्यांनी दिली. मृत नक्षलवाद्यांमध्ये 36 महिलांचाही समावेश आहे.

माओवाद्यांच्या सेंट्रल मिलिट्री कमिशनने ही माहिती दिली आहे. कमिशनने कबुली दिली की सुरक्षादलांमुळे त्यांचे खच्चीकरण झाले आहे. गेल्या दहा महिन्यात नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांच्या 360 ठिकाणी हल्ले केले होते. त्यात 70 वेळा चकमक उडाली. या चकमकीत दंडकारण्य जंगलात 75 जवान शहीद झाले होते. तसेच या एकूण घटनेत नक्षलवाद्यांनी 13 हत्यारे आणि 147 जणांना जखमी केल्याचा दावा माओवाद्यांनी केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या