जखमी करुन ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 13 आरोपींना सक्तमजुरी

गंभीर जखमी करुन ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नगरमधील 13 आरीपींना सक्तमजुरी व दंडाची शिक्षा येथील जिल्हा व सत्र न्यायलयाचे न्यायाधीश वी.व्ही.बोंबर्डे यांनी सुनावली आहे. आरोपीमध्ये अंबादास राऊ दरेकर, नारायण राऊ दरेकर, झुंबर राऊ दरेकर, दशरथ राऊ दरेकर, रमेश अंबादास दरेकर, अनिठ झुंबर दरेकर, संजय दशरथ दरेकर, मुनिठ दशरथ दरेकर, साखरबाड अंबादास दरेकर, नंदाबाई नारायण दरेकर, जनाबार्ई दशरथ दरेकर, कुसूमबाई झुंबर दरेकर व गुफाबाई अनिठ दरेकर (सर्व रा. हिरडगाव, ता. श्रीगोंदा, जि. नगर) यांचा समावेश आहे.

तक्रारदार बापूराव रंगनाथ दरेकर व जखमी साक्षीदार बाळासाहेब बापूराव दरेकर (दोघेही रा. हिरडगांव, ता. श्रीगोंदा, जि. नगर ) यांना मारहाण करुन गंभीर जखमी करुन ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात येथील 13 आरोपींना प्रत्येकी तीन वर्षाची सक्तमजुरी व 1000 रुपये  दंडाची शिक्षा सुनावली  आहे. तक्रादार, जखमी साक्षीदार व आरीपी हे एकमेकांचे भाऊबंद असून त्यांची सामार्ईक विहीर होती. 15 मे 2008 रोजी बापूराव रंगनाथ दरेकर यांचे घराचे बांधकाम चालू होते, त्यादिवशी सकाळी त्यांचा मुलगा बाळासाहेब घराचे बांधकामासाठी व जनावरांना पिण्यासाठी पाणी लागत असल्याने विहीरीवरील मोटार लालू करण्यासाठी गेला होता. तेथील मीटर सुरु करुन तो घरी आला. मात्र काही वेळानंतर पाणी बंद झाले. काय झाले हे पाहण्यासाठी विहीरीवर गेला होता. त्यावेळी आरोपी नारायण तेथे उभा होता व त्यानेच मोटर बंद केल्याचे सांगितले. त्यावेर बाळासाहेबने असे का केले याबाबत विचारणा केली असता नारायणने बाळासाहेब त्याला शिवीगाळ केली व इतर आरोपींना तेथे बोलावले.  बाळासाहेब वाद टाळून तेथून निघून गेला. काही वेळाने आरोपी फिर्यादी व जखमी साक्षीदार बाळासाहेब हे बांधत असलेल्या घराकडे काठ्या, कुर्‍हाड घेऊन आले व त्यांनी फिर्यादीस, साक्षीदारास मारहाण करण्यास सुरवात केली. त्यात बाळासाहेब जबर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले होते.

या प्रकरणाचा तपास शिवाजी सोनवणे यांनी केला. या प्रकरणामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ.शैला डांगे व इतर साक्षीदार संतोष भोस, सतिष सातपुते, कुंडलीक गावकर व पप्पी काळे यांच्या साक्ष महत्त्वपूर्ण ठरल्या. यांच्या साक्षी ग्राह्य धरण्यात आल्या. यानंतर न्यायलयाने जखमी करुन ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 13 आरोपींना सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड.केदार गोविंद केसकर यांनी काम पाहिले तर अ‍ॅड.केसकर यांना पैरवी पोलीस कॉस्टेबल वाघ तसेच बाळासाहेब दरेकर यांनी मदत केली.

आपली प्रतिक्रिया द्या