ठाण्यात तेरा वर्षाच्या मुलाने केला तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार

सामना ऑनलाईन । ठाणे

ठाण्यात एका तेरा वर्षाच्या मुलाने पॉर्न व्हिडीओ बघितल्यानंतर त्याच्या शेजारी राहणाऱ्या तीन वर्षीय मुलीवर बलात्कार केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्या मुलाला ताब्यात घेतले असून त्याची सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

आरोपी मुलगा हा ठाण्यातील एका शाळेत आठवी इयत्तेत शिकतो. सोमवारी दुपारी त्याची आई त्याच्या लहान बहिणीला क्लासला सोडायला गेलेली होती. त्यावेळी मुलगा घरात एकटाच होता. याच संधीचा फायदा घेत त्याने त्याच्या आईच्या मोबाईलवर पॉर्न व्हिडीओ बघितला. त्यानंतर शेजारीच राहणाऱ्या तीन वर्षाच्या मुलीला खेळवण्याच्या बहाण्याने तो त्याच्या घरी घेऊन आला व त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. मुलगी रडत असताना त्याने तिला मारहाण पण केली. मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून तिच्या आईने मुलाच्या घराचा दरवाजा ठोकवला. मुलाने दरवाजा उघडला तेव्हा मुलीच्या आईला जबर धक्काच बसला. मुलीवर बलात्कार झाल्याचे लक्षात येताच. त्यांनी काशिमीरा पोलीस ठाण्यात मुलाविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी मुलाविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.