
ऑरियनप्रो आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्टर बुद्धिबळ स्पर्धेच्या पहिल्या फेरीतच 13 वर्षीय हृदय मणियार या स्थानिक खेळाडूने अनुभवी स्लोव्हाकियाचा अनुभवी ग्रॅण्डमास्टर मॅनिक मिकुलसला जोरदार लढत देत बरोबरीत रोखले आणि आपल्या छोटय़ाशा कारकीर्दीतील सर्वोत्तम निकालाची नोंद केली.
जवळजवळ 500 गुणांचा रेटिंग फरक असूनही हृदयने उल्लेखनीय खेळ करताना संयम आणि अचूकतेचे अनोखे प्रात्यक्षिक सादर केले. प्रतिस्पर्धी ग्रॅण्डमास्टर असूनही त्याने प्रभावी चाली रचत त्याला वरचढ होण्याची संधी दिली नाही. ही बरोबरी पहिल्या फेरीतील सर्वात धक्कादायक निकाल ठरला आहे. ही एकमेव लढत वगळता उर्वरित 15 ग्रॅण्डमास्टर्सना 9 राऊंडच्या स्विस स्पर्धेच्या दुसऱया फेरीत प्रवेश करण्यासाठी फारसे प्रयास पडले नाहीत.