18 व्या मजल्यावरून उडी मारून अल्पवयीन मुलाची आत्महत्या, कारण अस्पष्ट

27

सामना ऑनलाईन । वडाळा

वडाळ्यात  एका 13 वर्षीय मुलाने 18  व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. त्याने आत्महत्या का केली याचे कारण अजून कळालेले नाही. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केलेली आहे.

मुलगा शाळेतून घरी आल्यावर दीड-दोन च्या सुमारास शेजाऱ्यांच्या घरी जेवायला गेला होता. 3.30 ला तो स्वत:च्या घरी 16 व्या मजल्यावर गेला अशी माहिती पोलिसांनी दिली तसेच त्यानंतर पाऊणे चारच्या सुमारास तो टेरेसवर गेला. त्यानंतर त्याने पाण्याच्या टाकीवर चढून उडी मारली. त्या मुलाचा मृतदेह इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ वॉचमनला दिसला. तसेच त्याची चप्पल टेरेसच्या टाकीजवळ आढळली. यावरून ही घटना आत्महत्येचीच आहे असा निष्कर्ष पोलिसांनी काढला.

मुलाच्या जाण्याने  आई-वडीलांना मोठा धक्का बसला आहे. त्याने आत्महत्येचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप  समोर आलेले नाही. घटनास्थळावरुन मुलाचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून याबाबत पुढील तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या