भाजप नेत्याच्या ‘हायवे’ कांडनंतर आता महिला नेत्याच्या मुलाचा कारनामा उघड, 130 अश्लील व्हिडीओ व्हायरल

मध्य प्रदेशमधील भारतीय जनता पक्षाचे नेते मनोहरलाल धाकड यांचे महामार्गावरील आक्षेपार्ह व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाले होते. यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती. हे प्रकरण शांत होत नाही तोच आता भाजपच्या महिला नेत्याच्या मुलाचे कारनामे समोर आले असून त्याचे 130 अश्लील व्हिडीओ समोर आले आहेत. यानंतर विरोधकांनी भाजपला घेरले असून सोशल मीडियावरही प्रचंड टीका होत आहे. भाजपच्या ‘नारी-वंदन’ अभियानाचे सत्य हेच आहे का? असा सवाल विरोधकांनी केला आहे.

उत्तर प्रदेशमधील मैनपुरी शहरातील भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षांच्या मुलाचे अश्लील व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. शहरातील वेगवेगळ्या हॉटेल्स, रेस्टॉरंट या ठिकाणी हे व्हिडीओ बनवण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे भाजपच्या महिला नेत्याच्या मुलाचे लग्नही झालेले आहे. मात्र पत्नी नांदत नसल्याने दोघांमध्ये गेल्या चार वर्षांपासून वाद सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी भाजपच्या महिला नेत्याच्या मुलावर त्याच्या पत्नीने सिगारेटने चटके दिल्याचा आरोप केला होता. पत्नीचा मानसिक छळ करण्यासाठी भाजपच्या महिला नेत्याचा मुलगा प्रेयसीसोबत अश्लील व्हिडीओ बनवायचा आणि तिला पाठवायचा. याची तक्रारही पीडित पत्नीने पोलिसात केली होती. मात्र महिला नेत्याने आपले राजकीय वजन वापरून हे प्रकरण दाबले होते.

पतीचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध आहेत. दोघेही शारीरिक संबंधांचे व्हिडीओ बनवतात आणि मला दाखवतात. आई भाजपमधील मोठे प्रस्थ असल्याने तू माझे काहीही उखाडू शकत नाही, असे म्हणत मला मानसिक त्रास दिला जात आहे, असा आरोप पीडित महिलेने केला होता. एवढेच नाही तर सासू आणि नणंदेवरही पीडितेने गंभीर आरोप केले होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून व्हिडीओ समोर आल्यानंतर भाजपच्या महिला नेत्याच्या मुलाचा शोध सुरू केला आहे. पोलीस आपला शोध घेत असल्याची खबर लागताच आरोपी फरार झाला आहे.

Manoharlal Dhakad Arrested : महामार्गावर महिलेसोबत खुलेआम रोमान्स, भाजप नेता मनोहरलाल धाकड यांना अटक

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल

भाजप नेते आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची गैरकृत्य उघडकीस येणाऱ्या मालिकेत मैनपुरीतील 130 व्हिडीओची भर पडली आहे. भाजपचा कर्नाटकातील कुख्यात कांडशी स्पर्धा सुरू आहे. विशेष म्हणजे हे व्हिडीओ मैनपुरीतील भाजप नेत्यांच्या घरातूनच व्हायरल झाले आहेत, त्यामुळे भाजपचा आयटी सेल विरोधकांनाही दोष देऊ शकत नाही. जर हिच परस्थिती राहिली तर महिला भाजप सदस्यांच्या सावलीपासूनही दूर राहतील, भाजपच्या महिला शाखा सुन्या पडतील. आपला स्वाभिमान जपण्यासाठी महिला भाजपपासून चार हात लांब जातील आणि त्यांचे कुटुंबीयही भाजपपासून अंतर ठेवतील, असा टोला सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी लगावला.