अमरावतीत आढळले कोरोनाचे 131 रुग्ण, तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

swab-test-corona-test

अमरावती जिल्ह्यात कोरोनाचे 131 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 9 हजार 512 वर पोहोचली आहे. तसेच गेल्या 24 तासात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नव्या 131 रुग्णांत सर्वात रुग्ण ग्रामीण भागातील आहे. एकट्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात 21 नवे रुग्ण आढळून आले असून परतवाडा येथे 9 तर चांदूर रेल्वे येथे 12 रुग्ण आढळून आले आहे. यासोबतच मोर्शी, चांदूर बाजार, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी सह इतरही तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. 131 पैकी 80 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. अशा तर्‍हेने 9,512 रुग्णांची आज नोंद झाली. अद्याप तिसरा अहवाल प्राप्त झाला नाही. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू शकते.
कोरोनामुळे आतापर्यंत 215 रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या 1954 रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयात उपचारार्थ भरती आहेत. तर गृहविलगीकरणात 488 रुग्ण आहेत. आजारातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 7,212 आहे.

जिल्ह्यात गेल्या 24 तासात तीन कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात मोर्शी येथील शम्स कॉलनीतील 70 वर्षीय पुरूष, अचलपूर येथील 65 वर्षीय महिला, त्याचप्रमाणे समर्थ कॉलनीतील 65 वर्षीय पुरूष यांचा समावेश आहे. जिल्ह्यात मृत रुग्णांचा आकडा 218 वर पोहोचला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या