रत्नागिरीत सापडले कोरोनाचे 14 रूग्ण, एकूण रुग्णसंख्या 334 वर

625

रत्नागिरी जिल्ह्यात आणखी 14 कोरोनाबाधित रूग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 334 वर पोहचली आहे. आज आणखी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृतांची संख्या 11 झाली आहे.

बुधवारी प्राप्त तपासणी अहवालात 14 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यातील एका रुग्णाचा मंगळवारी मृत्यू  झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रूग्ण वाढत आहेत. कोरोनाबाधितरूग्णांची संख्या 334 झाली असून त्यापैकी 125 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज जिल्ह्यात सापडलेल्या 14 पॉझिटिव्ह रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सध्या 198 रूग्ण उपचार घेत आहेत.

जिल्हयात आलेल्या एकूण नागरिकांची संख्या 1 लाख 14 हजार 534 आहे. जिल्हयातून बाहेरच्या जिल्हयात तसेच परराज्यात गेलेल्या मजूर व इतरांची संख्या 43 हजार 663 आहे. यातील 10 हजार 289  जण रेल्वेने गेले तर इतर खाजगी बसेस वा एस.टी.ने गेले आहेत.जिल्हयात होम क्वारंटाईनखाली असलेल्यांची संख्या 77 हजार 732  इतकी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या