रत्नागिरीत आढळले कोरोनाचे 14 रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 175 वर 

750

रत्नागिरी जिल्ह्यात आणखी 14 रूग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता 175 वर पोहचली आहे.

आज रात्री उशीरा आलेल्या तपासणी अहवालात कामथे येथील 4 आणि राजापूर येथील आठ अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. राजापूरात सापडलेल्या आठ रूग्णांपैकी दोन स्त्रिया आणि सहा पुरूष आहेत.हे रूग्ण कशेळी,वडदहसोळ आणि कोंडवाडी येथील आहेत. कामथे येथील दोघेजण मुंबईतून आलेले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 175 झाली आहे. त्यापैकी 67 जण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. आता पर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून 103 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या