संभाजीनगर-शहादा बसला भीषण अपघात, 15 जण जागीच ठार

513

संभाजीनगर-शहादा बसचा (एमएच 20, बीएल 3756) दोंडाईचा-शहादा मार्गावर भीषण अपघात झाला. रविवारी रात्रीच्या सुमारास बस आणि कंटेनरमध्ये (एपी 29, 7576) झालेल्या या अपघातात 15 जण जागीच ठार झाले. बसमधील अन्य 30 ते 35 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

संभाजीनगर-शहादा बस शहाद्याकडे धावत होती. याचवेळी शहाद्याकडून दोंडाईचाकडे येणाऱ्या कंटेनरसोबत बसची समोरासमोर धडक झाली. कंटेनरच्या वेगाच्या धडकेने बसचा अर्धा भाग अक्षरश: चिरफाळ्या केल्यासारखा फाटला. या भीषण अपघातात बस चालक मुकेश पाटील आणि कंटेनरचा चालकही जागीच ठार झाले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे मोठे आव्हान होते. यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली. घटनास्थळी रक्त आणि मांसाचा चिखल झाल्याची माहिती उपस्थितांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या