अमरावतीत 14 नवे रुग्ण; कोरोनााधितांची संख्या 1072 वर

379

अमरावती जिल्ह्यात गुरुवारी सकाळी आलेल्या कोरोना चाचणी अहवालात 14 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 1072 झाली आहे. गेल्या शनिवारपासून अमरावतीत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे.

यापूर्वी कोरोनाबाधितांची संख्या दररोज 10 ते 15 ने वाढत होती. मात्र, गेल्या शनिवारपासून दररोज 60 पेक्षा जास्त रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत. मंगळवारी सर्वाधिक 65 रुग्ण आढळले होते. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे अमरावतीत कोरोनाबाधितांची संख्या एक हजारावर गेली आहे. गुरुवारी सकाळी आलेल्या अहवालात सुरज नगरमधील 31 वर्षीय पुरुष, राहुल नगरमधील 39 वर्षीय महिला, रामपुरी कॅम्पमधील 45 वर्षांच पुरुष, बडनेरातील 61 वर्षीय महिला, सुजिया नगरातील 50 वर्षीय महिला, पूर्णा नगरातील 60 वर्षीय पुरुष, खापर्डे बगिचा येथील 64 वर्षीय महिला, अंबिका नगरातील 10 वर्षीय मुलगा, नागपुरी गेट येथील 42 वर्षीय पुरुष, हनुमान नगरातील 38 वर्षीय पुरुष, अंबिका नगरातील 65 वर्षीय महिला, निषाद कॉलनीतील 59 वर्षीय पुरुष, अंबिका नगरातील 5 वर्षीय मुलगा व अंबिका नगर येथील 72 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आतापर्यंत 667 रुग्णांची प्रकृती बरी झाली असून ते घरी गेले आहेत. तर ३६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या 369 जण उपचार घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या