परभणी जिल्ह्यात 14 नवे रुग्ण; कोरोनामुक्त झाल्याने 6 रुग्णांना डिस्चार्ज

455

परभणी जिल्ह्यात गेल्या 24 तासात 14 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 445 एवढी झाली आहे. तसेच आतापर्यंत 210 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच कोरोनामुळे 16 रुग्णांचा बळी गेला आहे. रुग्णालयातील संक्रमीत कक्षात सध्या 219 रुग्ण उपचार घेत आहेत.

परभणी शहरातील जुना पेडगाव रस्त्यावरील 53 वर्षीय महिला, 60 वर्षीय पुरूष, नांदखेडा रस्त्यावरील 20 वर्षीय महिला, जुना पेडगाव रस्त्यावरील वैभव नगरातील 57 वर्षीय महिला, 65 वर्षीय पुरूष, देशमुख गल्लीतील 30 वर्षीय महिला, परभणी ग्रामीण मधील दैठण्यातील 32 वर्षीय महिला,मानवत शहरातील मठगल्लीतील 31 वर्षीय महिला, 34 वर्षीय महिला, 38 वर्षीय पुरूष, आंबेडकर नगरातील 21 वर्षीय पुरूष, कडतन गल्लीतील 21 वर्षीय पुरूष, गजानन नगरातील 21 वर्षीय पुरूष व पॉवरलुममधील 21 वर्षीय पुरूष असे एकूण 14 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यात 7 महिला, 7 पुरूषांचा समावेश आहे.

आतापर्यंत एकूण 3947 संशयित रुग्ण दाखल झाले असून संसर्गजन्य कक्षात 281, विलगीकरण केलेले 517 व विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झालेले 3149 एवढे रुग्ण आहेत. एकूण 4193 संशयितांचे स्वॅब घेतले गेले असून त्यातील 3529 स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. तर 445 स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत. 125 स्वॅब अनिर्णायक असून 52 स्वॅब तपासणीस अयोग्य ठरले आहेत. 42 स्वॅबच्या अहवालाची प्रतिक्षा कायम आहे. शहरातील एकबाल नगरातील 75 वर्षीय व पूर्णेतील शास्त्री नगरातील 61 वर्षीय कोरोनाबाधिताचा बुधवारी मृत्यू झाला. एकबाल नगरातील रुग्णास मधुमेह, किडनी आजार, मुत्रमार्गे संसर्ग, फुफ्फुसामध्ये संसर्ग झाला होता. पूर्णेतील रुग्णास मधुमेहाचा आजार होता.

कोरोनामुक्त झालेल्या 6 रुग्णांना डिस्चार्ज
जिल्हा शासकीय रुग्णालयातील संक्रमीत कक्षातून 6 कोरोनामुक्त रुग्णांना रुग्णालय प्रशासनाने बुधवारी डिस्चार्ज दिला. त्यात परभणी शहरातील जागृती कॉलनीतील 32 वर्षीय महिला व 55 वर्षीय पुरूष, वडगल्लीतील 52 वर्षीय महिला असे शहरातील एकूण तीन, तसेच गंगाखेड शहरातील डॉ. आंबेडकर नगरातील 40 वर्षीय पुरूष, इसाद येथील 34 वर्षीय पुरूष व सोनपेठ तालुक्यातील भिसेगाव येथील 35 वर्षीय महिला असे एकूण 3 महिला व 3 पुरूष अशा एकूण 6 जणांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या