कोरोनाविरुद्धच्या लढाईत 140 देशांचे 30 हजारांहून अधिक योद्धे पुढे सरसावले

727

जगभरात थैमान माजवून पाच लाखांहून अधिक नागरिकांचा बळी घेणाऱया कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी आता जगातील 130 देशांचे 30 हजारांहून अधिक योद्धे पुढे सरसावले आहेत. हिंदुस्थान, अमेरिका आणि ब्रिटनसह अनेक देश कोरोनाला रोखणारी लस तयार करण्यासाठी युद्धपातळीवर संशोधन करीत आहेत. नव्या लसींच्या मानवी चाचणीसाठी संशोधकांना मानवी स्वयंसेवकांची मोठ्या संख्येने गरज भासणार आहे. पण आनंदाची बाब म्हणजे, कोरोनाला संपविण्यासाठी 30 हजारांहून अधिक योद्धय़ांनी स्वत:कर या लसींची चाचणी करून घेण्याची तयारी दर्शविली आहे. विशेष म्हणजे, अशा ,स्वयंसेवकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील ‘वन डे सुनर’ या सेवाभावी संस्थेने जगभरातील कोरोना लसींच्या चाचण्यांत स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊ इच्छिणाऱया जगभरातील नागरिकांची यादी बनविण्याचे काम हाती घेतले आहे. आतापर्यंत जगातील 30 हजारांहून अधिक नागरिकांनी या कोरोना योद्धय़ांच्या यादीत आपले नाव नोंदविले आहे. या यादीत आपले नाव नोंदविण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक पुढे येत आहेत. कोरोनाला पराभूत करणे हेच या कोविड-19 योद्धय़ांचे लक्ष्य आहे. या यादीत नाव नोंदविणारा नागरिक सुदृढ, कोणताही गंभीर आजार नसलेला आणि युवा असायला हवा, अशी या स्वयंसेवी संस्थेची अट आहे.

कशी होणार लसीची चाचणी!
सुदृढ आणि युवा स्वयंसेवकाला कोरोनाची नवी लस टोचून पुन्हा समाजात सोडून दिले जाईल. या स्वयंसेवकाच्या शरीरारावर या लसीचा काय परिणाम होतोय, याचा अभ्यास संशोधक करतील. या प्रक्रियेला मोठा वेळ लागणार असल्याने कोरोनावरील प्रभावी लस बाजारात यायला बराच वेळ लागेल, असे संशोधकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, अशी चाचणी मानवासाठी जीवघेणीही ठरू शकते. त्यामुळे कोणत्याही देशाने आपल्या नागरिकांवर अशी चाचणी घेण्यास परवानगी दिलेली नाही. अशा परवानगीसाठी अमेरिकेच्या ‘एफडीए’ संस्थेकडून अंतिम मंजुरी घ्याकी लागणार आहे. कोरोना योद्धय़ांचे निवेदन प्रथम अमेरिकन ‘एफडीए’कडे पाठविले जाईल. ‘एफडीए’ अशा स्वयंसेवकांची बारकाईने वैद्यकीय तपासणी करूनच नंतर नव्या लसीच्या मानवी चाचणीला परवानगी देणार आहे. अशा प्रकारेच मानवी चाचण्या करून मलेरिया आणि पटकी अशा साथीच्या आजारांची प्रभावी लस बाजारात विक्रीसाठी आणण्यात आली होती. कोरोनाच्या नव्या लसीच्या मानवी चाचणीसाठी नोंदणी मिळविलेली एप्रिल सिपकिन्स म्हणते, ‘कोणत्याही नव्या लसीच्या शरीरावरील चाचणीत धोका असतोच. पण मानवी समाजाच्या भल्यासाठी कोणीतरी हा धोका पत्करायलाच हवाय. आमच्यावरील चाचणी यशस्वी झाली तर कोरोनाचा खात्मा करायला मोठी मदतच होणार आहे.’

आपली प्रतिक्रिया द्या